वर्षभरात महाराष्ट्रात रस्ते अपघातात बळी गेलेल्यांची जबाबदारी कोण घेणार?-राष्ट्रवादी

0

मुंबई-राज्य खड्डे मुक्त करण्याची घोषणा भाजपने सत्तेत आल्यानंतर केले होते. मात्र सत्ता येऊन ४ वर्षे झाली मात्र अद्याप महाराष्ट्र खड्डे मुक्त झालेला नाही. राज्य घड्डे मुक्त करण्याच्या घोषणेचे काय झाले असा प्रश्न उपस्थित करत रस्ते अपघातात नाहक बळी गेलेल्या नागरिकांच्या मृत्यूस कोण जबाबदार आहे असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने भाजप सरकारला केला आहे. वर्षभरात देशात रस्ते अपघातात २० हजार ४५७ तर महाराष्ट्रात १८६१ जणांना जीव गमवावा लागला. यास जबाबदार कोण? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे उपस्थित करण्यात आला आहे.

खड्डे व बेशिस्त  वाहतूक नियोजनाच्या बळीबाबत जबाबदार धरून निद्रिस्त सरकारवर कलम ३०२ लावणार का? असा सवाल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

 

Copy