वरिष्ठांच्या जांचाला कंटाळून लिपीकाची रेल्वेखाली आत्महत्या

0
छळ करणाऱ्‍या अधिकाऱ्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी
जळगाव – जळगाव जिल्हा परिषदेतून नुकतेच जामनेर पंचायत समितीत बदली झालेल्या लिपीकाने गुरूवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास 40 वयोगटातील इसमाने धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केली होती. याबाबत लोहमार्ग पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी ओळख पटविल्यानंतर वरिष्ठांकडून वेळोवळी मानसिक त्रास देत असत तर गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना निलंबन करण्यात आले असल्याचे उघडकीस आले आहे. पुष्पकांत भागवत पाटील (वय-40) रा. खोटे नगर असे मयताचे नाव आहे.  पुष्पकांत पाटील हे गेल्या 15 वर्षांपासून जिल्हा परीषदेच्या शिक्षणविभागात कनिष्ठ लिपीक म्हणून कामाला आहे. चार महिन्यांपुर्वी पुष्पकांत पाटील यांची जामनेर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात बदली झाली. शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी यांनी वेळीवेळी मानसिक त्रास देणे व सायंकाळी उशीरापर्यंत कामावर थांबवून ठेवणे तसेच काही कारणास्तव गटशिक्षणाधिकारी यांनी पुष्पकांत पाटील यांच्याकडून 5 हजार रूपये उसने घेतले होते. मात्र ते पैसे परत न देता त्यांना मानसिक त्रास देणे सुरू केला होता असा आरोपी मयताची पत्नी सविता पाटील यांनी बोलतांना सांगितले. तसेच काहीही कारण नसतांना त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना कामावरून निलंबन केले होते. त्यामुळे त्यांच्यात नैराश्य आले होते. गेल्या आठवड्यापासून ते एकाकी राहत होते. एकाकीपणा त्यांनी दारू पिणे देखील वाढले. या नैराश्यातून गुरूवारी 04 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता घरातून बाहेर पडले व त्यांनी रेल्वे परीसरातील कांताई नेत्रालयाजवळील मालधक्क्याजवळ पश्चिम रेल्व लाईनच्या खंबा क्रमांक 303/31-33 दरम्यान धावत्या रेल्वेखाली येवून आत्महत्या केली. याबाबत लोहमार्ग पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
Copy