वराड बुद्रुक व खुर्दला ग्रामस्तरीय कोरोना समितीची स्थापना

0

बोदवड : तालुक्यातील वराड बुद्रुक / खुर्द येथे भुसावळ प्रांतांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्तरीय कोरोना समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही तसेच गावात सार्वजनिक ठिकाणी कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत शिवाय गावात बाहेर गावाहून व प्रांतातून आलेल्या नागरीकांची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

ग्रामस्थांना घरातच राहण्याच्या सूचना
गावातील नागरीकांना आपल्या घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तींना आपल्या स्वतःच्या घरातच 14 दिवस थांबून राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. या प्रसंगी सरपंच सुशीलाबाई देवराम भिल, तलाठी एम.पी.राणे, ग्रामसेवक गणेश चौबे, पोलिस पाटील, अरुणा सुभाष जगताप, गोपाल कौतीक पाटील, अंगणवाडी सेविका विजयाबाई बडगुजर, अंजली पुरुषोत्तम पाटील, आरोग्य सेविका रुचाली विजय पेठे, आशा सेविका अनुसया बहादूर पाटील व गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते. शासनाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचा तो लोकांकडून करून घेण्याचा प्रयत्न समितीचा राहील, अशी माहिती समितीच्या पदाधिकार्‍यांनी दिली.

Copy