वराडसीम गावातून 11 हजारांची देशी-विदेशी दारू जप्त

0

भुसावळ- तालुक्यातील वराडसीम गावातील मंगेश नामदेव नारखेडे यांच्या ताब्यातून तालुका पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 11 हजार 112 रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. टँगोसह संजीवी देशीच्या तसेच कॅनॉन कंपनीच्या 12 बियर बॉटल पोलिसांनी जप्त करीत नारखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक दिलीप पाटील, विठ्ठल फुसे, उमेश बारी, हर्षवर्धन सपकाळे, रीयाज काझी आदींच्या पथकाने केली.

Copy