वराडसीममध्ये जुगारावर पोलिसांची धाड : पाच आरोपींना अटक

भुसावळ : तालुक्यातील वराडसीम गावाजवील मधुकर तुकडू ढाके यांच्या शेताचे बाजूला निंबाच्या झाडाखाली बुधवारी दुपारी 5.30 वाजेच्या सुमारास जुगाराचा डाव सुरू असताना तालुका पोलिसांनी छापा टाकून पाच जुगार्‍यांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून जुगाराच्या साहित्यासह एक हजार 630 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणी संशयीत आरोपी रमेश बाबुराव पाटील, गोपीचंद मानसिंग पाटील, विजय सुकराम कोळी, राहुल बळीराम वाघ, राजू सीताराम शिंदे (सर्व रा.वराडसीम, ता.भुसावळ) यांना अटक करण्यात आली व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहा.निरीक्षक रुपाली चव्हाण, हवालदार विठठल फुसे, हवालदार युनूस शेख मोरे,  नाईक राजेंद्र पवार, राहुल महाजन, कॉन्स्टेबल बारी आदींच्या पथकाने केली.