वराडसीमच्या विवाहितेचा छळ : पतीसह सासुविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ- तालुक्यातील वराडसीम येथील सासर व जळगाव येथील माहेर असलेल्या विवाहितेने रीक्षा घेण्यासाठी दोन लाख रुपये न आणल्याने शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासुविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार सुमय्याबानो वसीम पिंजारी (25, वराडसीम, पिंप्राळा, जळगाव) या विवाहितेच्या तक्रारीनुसार संशयीत आरोपी पती वसीम भिकन पिंजारी व सासु नजीम भिकन पिंजारी (वराडसीम) यांनी 31 मार्च 2013 च्या तीन महिन्यानंतर ते 27 जून 2016 रोजी दरम्यान वेळोवेळी वराडसीम येथे माहेरून रीक्षा घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत म्हणून छळ करीत गांजपाठ केला. पैसे न आणल्याने माहेरी टाकून देण्यात आल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. तपास हवालदार हर्षवर्धन सपकाळे करीत आहेत.

Copy