Private Advt

वराडसीमच्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

भुसावळ : तालुक्यातील वराडसीम येथील श्री दत्त मंदिराजवळील रहिवासी असलेल्या वसीम उर्फ मोसीन भिकन पिंजारी (35) या युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसात वाजेपूर्वी घडली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणी अल्ताफ कदीर पिंजारी (वराडसीम) यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, तरुणाच्या आत्महत्येची माहिती कळताच कुर्‍हा औट पोस्टचे युनूस मुसा शेख, राहुल महाजन, उमेश बारी यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.