वरणगााव पाणीपुरवठा योजनेला गतीसाठी प्रधान सचिवांना सूचना देणार

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस : वरणगाववर माझे विशेष लक्ष : माजी नगराध्यक्ष सुनील काळेंशी चर्चा

वरणगाव :  जिल्हा दौर्‍यावर आलेल्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नव्या मुक्ताबाई मंदिरावर वरणगावातील भाजपा पदाधिकार्‍यांनी दुचाकी रॅली काढून स्वागत केले. तनिष्क मिलिंद भैसे याने हाताने बनविलेल्या गौतम बुद्धांची व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती व देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोची स्केचची प्रतिमा भेट देण्यात आली. दरम्यान, माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी स्वागतप्रसंगी वरणगाव शहरासाठी मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेला अद्याप गती मिळाली नसल्याचे सांगितल्यानंतर फडवणीस यांनी योजनेचे काम जलद गतीने होण्यासाठी प्रधान सचिव यांना कडक सूचना देवून कार्यवाही करायला सांगतो, असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विविध मागण्यांबाबत दिले निवेदन
याप्रसंगी भाजपा पदाधिकार्‍यांनी विविध मागण्यांचे फडवणीस यांना निवेदन दिले. निवेदनाचा आशय असा की, दीपनगर वीज निर्मिती केंद्रात राजकीय आकसापोटी भाजपा कार्यकत्यांना कामावरून कमी केले जात आहे, त्यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करून त्यांना कामावर घेण्यात यावे तसेच वरणगाव शहरात कोविड सेंटर सुरू करावे, फुलगाव फाटा ते साई बाबा मंदिर समांतर महामार्गाचे काम सुरू करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना विनंती करावी तसेच भोगावती नदी सुशोभीकरणाला मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात यावी, वरणगाव शहरात भूमिगत गटारिचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे, तो मार्गी लावण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या.

सर्व मागण्या मार्गी लावण्याचे आश्‍वासन
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वरणगावातील सर्व समस्या लवकरच मार्गी लावण्यात येतील, वरणगाववर माझे विशेष लक्ष आहे. मी मुख्यमंत्री असताना वरणगाव शहराला भरगोस निधी दिला असल्याचेही विरोधी पक्ष नेते यावेळी म्हणाले. यावेळी तनिष्क मिलिंद भैसेची कलाकृती पाहून तनिष्क हा उद्याच्या भारताचे उज्वल भविष्य असल्याचे सांगत त्यास पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

निवेदन देताना यांची होती उपस्थिती
निवेदन देताना माजी नगराध्यक्ष सुनील काळे, ज्येष्ठ नेते दत्तूपंत मराठे, शहराध्यक्ष सुनील माळी, सरचिटणीस गोलू राणे, आकाश निमकर, उपाध्यक्ष हितेश चौधरी, शामराव धनगर, सुभाष धनगर, रमेश पालवे, गोलू वंजारी, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, राहुल जंजाळे, शंकर पवार, कृष्णा माळी, संदीप माळी, नामदेव मोरे, मिलिंद भैसे, तनिष्क भैसे, कमलाकर मराठे, महिला मोर्चा अध्यक्ष प्रणिता पाटील, पप्पू ठाकरे, जयेश कपाटे, शांताराम माळी, गजानन वंजारी, योगेश माळी, डॉ.प्रवीण चांदणे, लखन माळी, रॉक कश्यप, कुंदन माळी, तेजस जैन, विक्की चांदेलकर, नरेंद्र बावणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.