Private Advt

वरणगाव शहरात भाजपाने रोखला रस्ता

भाजपा नेत्यांवर कारवाई षडयंत्राचा निषेध : वरणगाव शहरात भाजपाचे रस्ता रोको आंदोलन

वरणगाव : माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करून मोक्का लावण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केला असून यासाठी सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांनी मदत केल्याने संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी वरणगावातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी करीत रास्ता रोको आंदोलन केले. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिस प्रशासनालाही निवेदन देवून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
वरणगाव शहराच्या वतीने वरणगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच पोलिस स्टेशन येथे एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवीण चव्हाण मुर्दाबाद, महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, गिरीश भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
आजच्या या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केले. यावेळी भाजयुमोचे शहराध्यक्ष आकाश निमकर, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रणिता चौधरी-पाटील, तालुकाध्यक्ष मनीषा पाटील, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रुख्मिनी काळे, माजी सरपंच सुभाष धनगर, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, मिलिंद भैसे, डॉ.सादिक, किसान मोर्चाचे ऋषिकेश महाजन, रमेश पालवे, गजानन वंजारी, अरुण बावणे, डॉ. नाना चांदणे, संदीप माळी, पप्पू ठाकरे, डी.के.खाटीक, मुस्लिम अन्सारी, कमलाकर मराठे, हितेश चौधरी, नटराज चौधरी, गोलू राणे, अंकुश साबळे, पिंकेश घाटोळे, अनिल वंजारी, बाळा धनगर, अरुण बावणे, शेख साहेब, राहुल जंजाळे, कुंदन माळी, उषा पवार, भाग्यश्री पाटील यांच्यासह असंख्य नागरीक, महिला उपस्थित होत्या.