Private Advt

वरणगाव शहरातून दुचाकी लंपास

वरणगाव : शहरातील रामपेठ परीसरातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रोशन शहा फत्तु शहा फकीर (36, रा.पिंपळगाव, ता.भुसावळ) हे कामाच्या निमित्ताने सोमवार, 18 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास वरणगाव येथील रामपेठ परीसरात दुचाकी (एम.एच.19 डी.आर.4231) दुचाकी पार्किंगला लावली होती. साडेसात वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेला मोबाईल आणि दुचाकी लांबवली. या प्रकरणी वरणगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेंद्र तायडे करीत आहेत.