वरणगाव येथे संत जगनाडे महाराजांना अभिवादन

0

वरणगाव : आयुध निर्माणीमध्ये उन्नती समाजातर्फे संत जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सिताराम चौधरी, रावेर तालुक्यातील नगरपालिकेचे नगरसेवक सुरज चौधरी, शारदा चौधरी, वरणगाव पालीकेचे नगरसेवक राजेद्र चौधरी, गणेश चौधरी, प्रतिभा चौधरी, कार्यप्रबंधक सुनिल तेली, एस.ए. पाटील, भारतीय महासंघाचे सचिव सचिन चौधरी आदी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन
करण्यात आले.

येथील तेली समाज मंगल कार्यालयात संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक राजेंद्र चौधरी, गणेश चौधरी, बाळासाहेब चौधरी, समाधान चौधरी, राजेश चौधरी, सुरेश चौधरी, बापू चौधरी, चंद्रकांत चौधरी, अशोक चौधरी, निंबा चौधरी, आदी समाजबांधव उपस्थित होते. यावेळी भोजन दान करण्यात आले.

दिनदर्शिकेचे प्रकाशन
यावेळी संताजी दिनदर्शिका 2017 चे प्रकाशनासह समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक सुरज चौधरी तेली समाजाने एकत्र राहण्याचे आवाहन केले तर राजेंद्र चौधरी यांनी संतांजीचे कार्य सर्व समाजासाठी प्रेरणादायी प्रतिपादन केले. कार्यकम यशस्वीसाठी मंगेश चौधरी, निलेश कर्डीले, सुधाकर चौधरी, आंनद चौधरी, गजानन चौधरी, निलेश चौधरी, संतोष चौधरी, समाधान चौधरी, अंबादास भलाभले आदी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.