वरणगाव महाविद्यालयात पारंपारिक वेशभूषा दिन

0

वरणगाव । येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पारंपारीक वेशभूषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य अनंतराज पाटील, उपप्राचार्य के.बी. पाटील, प्रा. दिनू पाटील, प्रा. अनिल शिंदे, प्रा. एस.ए. गायकवाड, प्रा. बी.बी. पाटील, प्रा. ए.जी. काटकर, प्रा. बच्छाव, प्रा. अजीत कलवले, प्रा. बी.जी. देशमुख, प्रा. अविनाश बडगुजर, प्रा. सुभाष वानखेडे, प्रा. राहुल संदानशिव, प्रा. अशोक चित्ते, प्रा. पी.बी. देशमुख, प्राध्यापिका वृशाली जोशी, संध्या निकम आदींनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सहभाग घेऊन पारंपारिक वेशभूषा कार्यक्रमास सहकार्य केले.

शिक्षकांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
विद्यार्थ्यांना आपल्या पारंपारीक वेशभूषेचे ज्ञान अवगत व्हावे, या अनुषंगाने ही संकल्पना महाविद्यालयात राबविण्यात आल्याचे शिक्षकांनी आपल्या मनोगतातून सांगीतले. प्राचार्य अनंतराज पाटील यांनी आपले विचार व्यक्त करुन वेशभूषेचे महत्व मार्मिक शब्दात व्यक्त मांडले. यावेळी शिवाजी महाराज, जिजामाता, बानुबाई, पठाण, नवरदेव, जिजाऊ, हिरो, मॉडेल यांच्या वेशभूषेत आकर्षणाला केंद्रबिंदू ठरले. कार्यक्रमाप्रसंगी विविध विषयांवर उपस्थित शिक्षक व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. शिवाजी धनगर, हेमांगी कोल्हे, आशिष चंदने, आकाश पिळोदकर, गायत्री भंगाळे, शाहरूख खान, खुशबू चौधरी, गायत्री चौधरी आदी विद्यार्थ्यांनीही आपले विचार माडले.