वरणगाव फॅक्टरी परीसरात अनोळखी इसमाची आत्महत्या

भुसावळ : वरणगाव फॅक्टरी परीसरात अज्ञात इसमाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली तर मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताने आत्महत्या केली की घातपात अशी शंका उपस्थित होत आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला असून अहवालातून नेमका प्रकार उघडकीस येणार आहे.

अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगावच्या मुख्य दवाखान्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गधा गेट (मॅगझीन) जवळ अज्ञाताने खैराच्या झाडाला मफलरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी गुरे चारणार्‍या इसमास हा प्रकार दिसला. त्याने ही माहिती फॅक्टरी सुरक्षा प्रशासनाला दिल्यानंतर वरगणाव पोलिसांनाही माहिती कळवण्यात आली.
वरणगावचे सहा.निरीक्षक आशिषकुमार अडसूळ, सहायक फौजदार नरसिंग चव्हाण व सहकार्‍यांनी घटनास्थळी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.