वरणगाव नगरपरीषदेस कायमस्वरूपी मुख्यधिकारी द्या ; प्रधान सचिवांकडे मागणी

प्रशासकीय राजवटीत कायम स्वरूपी मुख्यधिकारी नसल्याने वरणगाव चा विकास खुंटला : माजी नगराध्यक्ष सुनील काळे

वरणगाव : नगरपरीषदेला कायमस्वरूपी मुख्यधिकारी देण्याची मागणी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली आहे. वरणगाव शहर हे 50 हजार लोकसंख्येचे शहर आहे नगरपरीषदेचे मुख्यधिकरी शाम गोसावी यांची जळगाव महानगरपालिकेच्या उपायुक्त पदी बढती झाल्यामुळे वरणगाव नगरपरीषदे चे मुख्यधिकारी पद रिक्त असून सावद्याचे मुख्यधिकारी सौरभ जोशी यांच्या कडे अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी यांनी सोपविला आहे मात्र सावदा येथूनप रोज कारभार सौरभ जोशी यांच्याकडून पाहवला जात नसल्याने वरणगाव शहरात विविध विकास कामे आम्ही मंजूर झाली असलीतरी ही कामे करताना अडचण निर्माण होत आहे. प्रशासकीय राजवट असल्याने मंजूर कामे खुंटली आहे.

पूर्णवेळ मुख्याधिकार्‍यांची मागणी
मंजूर पाणीपुरवठा योजनेच्या कामाला प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे शिवाय बगीचे भोगावती नदी शुशोभिकरण सांडपाणी प्रकल्प रस्ते गटारी यासह अनेक प्रकल्प मंजूर आहे पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ते सुरू होत नाही आताच्या मुख्याधिारी यांना वरणगावला पूर्ण वेळ कामकाज नाही . सावदा नगपरीषदेचा कार्यभार असल्याने कामकाजासाठी पूर्णवेळ मिळत नसल्याने वरणगावच्या विकासावर परीणाम होत असून व जनतेच्या समस्या सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने याचा त्रास जनतेला होत आहे. निवेदनाची प्रत प्रधान सचिव, नगरविकास विभागासह विरोधी पक्ष नेते देवेंद्र जी फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन, तालुक्याचे आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांच्याकडे देण्यात आली आहे.