वरणगाव कोरोना योद्ध्यांना मदतीचा हात

0

वरणगाव : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून पुढील धोका लक्षात घेऊन सर्वेक्षण सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या गंभीर काळात शहरात होमगार्ड तसेच पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी आपापल्यापरीने परीरस्थिती हाताळत असून त्यांच्या ह्या लोकहितवादी कामात एक मदतीचा हात म्हणून रविवारी ओम सिध्दगुरु नित्यानंद प्रतिष्ठान, भुसावळ संचलित वासुदेव नेत्रालयातर्फे सर्वांना प्रोटेक्टिव्ह गॉगल्स, उलन हात मोजे भेट म्हणून देण्यात आले. याआधीदेखील वासुदेव नेत्रालयाने पोलिस कर्मचार्‍यांची वाहने व लाठ्या आदींचे निर्जंतुकीकरण केले होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी वरणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे, हरीश भोये, गणेश महादेव शेळके, माझर खान, नावेद अली, मनोहर पाटील, सुनील वाणी, राहुल येवले, होमगार्ड उमेश इंगळे, महेश पाटील, आसीफ पिंजारी, लोकेश महाजन, दर्शन जैन, जय तोताणी आदींसह तुकाराम पाटील, कपिल राणे, साजन गवळी, मझर शेख, आमीन शेख, दीपक फेगडे, राहुल कोचुरे तसेच वासुदेव नेत्रालतील सहकारी वर्ग उपस्थित असल्याचे वासुदेव नेत्रालयाचे डॉ.नितु पाटील यांनी कळवले आहे.