वरणगावात होणार लखलखाट : आठ ठिकाणी पडणार सौर उर्जेवरील दिव्यांच्या ‘प्रकाश’

0

डीपीडीसीतील कामाचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या हस्ते भूमिपूजन

वरणगाव : जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून शहरातील विविध भागात आठ सौर उर्जेवरील दिवे मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून डीपीडीसी सदस्य सुनील काळे यांनी वरणगाव शहरातील पोलिस स्टेशन, बसस्थानक चौक, हनुमान व्यायाम शाळा, स्मशान भूमी, जुने गाव, कब्रस्थान, सिद्देश्‍वरनगर, स्मशानभूमी भागात सौर उर्जेवरील स्वयंचलीत दिवे मंजूर केले आहेत.

यांची होती उपस्थिती
कामाच्या भूमिपूजन प्रसंगी सहाय्यक निरीक्षक संदीप कुमार बोरसे, मुख्याधिकारी शामकुमार गोसावी, उपनगराध्यक्ष शेख अखलाक यांच्यासह कामगार नेते मिलिंद मेढे, कमलाकर मराठे, हितेश चौधरी, संजय सोनार, शंकर पवार, किशोर सोनार, शामराव धनगर यांची उपस्थिती होती.

वरणगावात होणार लखलखाट : सुनील काळे
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले की, डीपीडीसीच्या माध्यमातून तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वरणगाव शहराच्या दृष्टीने महत्वाच्या जागेवर सौर उर्जेवर चालणारे पथदिवे मंजूर केले होते व सायंकाळी हे दिवे सुरू होणार असून सकाळी ते आपोआप बंद होणार आहेत. लवकरच शहरातील ज्येष्ठ नागरीकांसाठी बेंच सुद्धा बसवण्यात येणार असून त्यासाठी मुख्याधिकार्‍यांनी प्रक्रिया राबवली असल्याची माहितीही काळे यांनी दिली.