Private Advt

वरणगावात वाढत्या महागाई विरोधात आंदोलन

वरणगावात शिवसेनेतर्फे बसस्थानक चौकात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

भुसावळ : पेट्रोल, डिझेलसह स्वयंपाकाचा गॅस व खाद्य तेलाच्या किंमती यांचे दिवसेंदिवस वाढत असून वाढत्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याने या विरोधात युवा सेना-शिवसेनेतर्फे रविवारी सायंकाळी सात वाजता बस भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे बसस्थानक चौकात आंदोलन करण्यात आले. युवा सेना-शिवसेनेने यावेळी पंतप्रधान मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून उपरोधीक ‘थाळी बजाओ’ आंदोलन केले.

वाढत्या महागाईविरोधात वरणगावात आंदोलन
युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने आंदोलन करण्यात आले. संपूर्ण राज्यात पेट्रोल, डिझेल, खाण्याचे तेल, गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडल्याने महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. दररोज वाढत असलेल्या भाववाढीच्या विरोधात वरणगावात रविवारी युवा सेना-शिवसेना यांच्या वतीने बस स्टॅन्ड चौकात सायंकाळी सात वाजता आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात ‘वारे मोदी तेरा खेल..सस्ती दारू महेगा तेल’, ‘बहोत हज्ञी गयी महंगाई की मार…होश मे आवो मोदी सरकार’, थाली बजाओ खुशिया मनाओ, अशा विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्याने बसस्थानक परीसर घोषणांनी दणाणला होता.

यांचा आंदोलनात सहभाग
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, युवा सेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, जिल्हा संघटक विलास मुळे, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, अल्पसंख्यांक समाजाचे नेते सय्यद हिप्पी शेठ, शहरप्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर, तालुका अल्पसंख्यांक संघटक मोहसीन खान, सईद मुल्लाजी, वकील शेख, सुरेश चौधरी, उपशहर प्रमुख कालू शर्मा, आबा सोनार, शहर संघटक हर्षल वंजारी, बाळा माळी, शहर समन्वयक किरण माळी, विलास वंजारी, सुनील देवघाटोळे, मुजाहिद खान, सुफियान शेख, संदीप वाणी, उमाकांत झांबरे, यशवंत बढे, बाळू माळी, निलेश काळे, किरण माळी, संकेत माळी, पवन माळी, रितेश माळी, कुणाल माळी, अतुल पाटील, नितीन पाटील, कृष्णा पुजारी, किरण माळी, वैभव लोखंडे, दिपक शेडके, प्रकाश कोळी, भुरा पाटील यांच्यासह युवा सेना शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.