वरणगावात भाजपा पदाधिकार्‍यांचे रस्ता रोको आंदोलन

निलंबन रद्द न केल्यास मंत्र्यांना फिरकू देणार नाही : माजी सभापती राजेंद्र चौधरी

वरणगाव : पावसाळी अधिवेनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षण मुद्यावरून झालेल्या रणकंदनानंतर भाजपाच्या आमदारांना एक वर्षांसाठी निलंबीत करण्याच्या आल्याच्या निषेधार्थ वरणगावात भाजपा पदाधिकार्‍यांनी बसस्थानकाजवळ रस्ता रोको आंदोलन करीत आघाडी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. 12 आमदारांचे निलंबन तातडीने रद्द करावे अन्यथा आघाडी सरकारमधील मंत्र्यांना जिल्ह्यात फिरकू देणार नाही, असा इशारा भाजपाचे जिल्हा चिटणीस राजेंद्र चौधरी व माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला.

यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, हाजी अल्लाउद्दीन सेठ, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेविका माला मेढे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा प्रणिता पाटील-चौधरी, जयश्री अवतारे, वर्षा बढे, माजी सरपंच सुभाष धनगर, गोलू राणे, नटराज चौधरी, हितेश चौधरी, मिलिंद भैसे, साबीर कुरेशी, डॉ.सादिक शेख, युसूफ खान, भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भोई, अल्पसंख्यांक आघाडी शहराध्यक्ष डी.के.खाटीक, कृष्णा माळी, गजानन वंजारी, योगेश माळी, जय चांदणे, बाळू कोळी, संदीप वाघ, संदीप माळी, इरफान पिंजारी, पप्पू ठाकरे, ज्ञानेश्वर घाटोळे, शंकर पवार, साबीर कुरेशी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी यांनी आघाडी सरकारवर सडकून टीका करीत भाजपाचे आमदार ओबीसी व मराठा अरक्षणासाठी आग्रही असतांना सोमवारी राजकीय आकसापोटी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह 12 आमदारांचे निलंबन करून लोकशाहीचा गळा चिरण्यात आल्याचे ते म्हणाले.