वरणगावात प्रशिक्षण केंद्र ठेवण्यासह पत्रकारांवरील गुन्हे मागे घ्या

0

भुसावळ : हतनूर येथे मंजूर असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्राचे स्थलांतर न करता ते तेथेच कार्यान्वीत करावे तसेच औरंगाबाद दैनिक दिव्य मराठीचे प्रकाशक, संपादक व पत्रकार यांच्याविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेवून ते रद्द करावेत, अशी मागणी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागातर्फे प्रांताधिकार्‍यांना मंगळवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक योगेंद्रजी पाटील, जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, भुसावळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज पाटील, जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी, उपाध्यक्ष ईस्माईल गवळी, तालुका सचिव ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष रवी पाटील, अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनील जोहरे, विजय तुरकेले, दिलीप क्षिरसागर, संदीप मोरे उपस्थित होते.

Copy