वरणगावात पोलिसावर हल्ला : चौघांविरुद्ध गुन्हा

3

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथे पोलिसावरच जमावाने हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली तर एका अल्पवयीन संशयीतास ताब्यात घेण्यात आले. सय्यद शकील उर्फ अरबाज सय्यद (21), सय्यद अलीम सय्यद सलीम (35), सय्यद मुस्तकीन सय्यद सलीम (30) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलिसाला काठीने केली मारहाण
शहरातील तपत कठोरा रोडवर तरुणांचा घोळका रस्त्यावर बसलेला असताना तक्रारदार तथा पोलिस कर्मचारी मनोहर पाटील यांनी हटकले तसेच संचारबंदी सुरू असल्याने आपापल्या घरी जाण्यास सांगितले असता जमावाने पोलिसांच्या वाहनाला लाथ मारून खाली पाडले तसेच कर्मचार्‍याच्या डोक्यावर काठीने मारहाण केल्याने तब्बल 9 टाके पडले. या प्रकरणी चौघा आरोपींविरुद्ध वरणगाव पोलिस स्टेशन ठाण्यात 86/20 भादंवि 307,353,332,333,143,144,147,149,188,269,270 सह साथ रोग प्रतिबंधक कायदा कलम 3, कोविड 19 उपाय योजना नियम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक संशयीत आरोपी अल्पवयीन असल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. तपास सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे करीत आहेत.

Copy