वरणगावात गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत : आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : गावठी कट्टा जप्त

वरणगाव : शहरातील प्रतिभा नगर चौक परीसरात सार्वजनिक संशयीत गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने बुधवारी रात्री कारवाई करीत संशयीताच्या मुसक्या आवळल्या. संशयीत यश ऊर्फ (सोनु) युवराज तायडे (19, रा.प्रतिभा नगर चौक, वरणगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून 20 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून त्याच्याविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जिल्हा अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, हवालदार दीपक पाटील, हवालदार लक्ष्मण पाटील, नाईक श्रीकृष्ण देशमुख, नाईक रणजीत जाधव, नाईक किशोर राठोड, कॉन्स्टेबल विनोद पाटील, कॉन्स्टेबल ईश्वर पाटील, चालक हवालदार राजेंद्र पवार आदींच्या पथकाने केली.

Copy