वरणगावातून 24 परप्रांतीय प्रवाशांना छत्तीसगड बॉर्डरपर्यंत सोडले

0

वरणगाव : नाशिक येथून छत्तीसगडकडे पायी निघालेले 24 परप्रांतीय प्रवासी वरणगावात पोहोचल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी त्यांची चहा-पाण्यासह नाश्त्याची व्यवस्था केली शिवाय त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी सहकार्यदेखील केले. भुसावळ आगाराने बस उपलब्ध केल्यानंतर तब्बल 24 प्रवाशांना छत्तीसगड राज्यातील देवरी बॉर्डरपर्यंत सोडण्यासाठी बस रवाना झाली. दरम्यान, तेथून छत्तीसगड जाण्यासाठी त्या राज्याने बसेसची सुविधा उपलब्ध करून दिल्याने या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी दिला मदतीचा हात
नाशिक येथून छत्तीसगड येथे पायी जाणारे 24 प्रवासी वरणगाव महामार्गावरील गुरांच्या बाजाराजवळ कडक उन्हात उभे असल्याची माहिती येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राजेंद्र चौधरी यांना समजल्यानंतर त्यांनी लगेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष माळी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, यश चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या सविता माळी, शारदा माळी, गंभीर माळी, प्रवीण चौधरी, बाळा माळी, किरण माळी, टीनु माळी यांना गुरांच्या बाजाराजवळ पाठवले व त्यानंतर या प्रवाशांची चहा, पाण्यासह नाश्ताची व्यवस्था नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी लाऊन दिली.

ग्रामीण रुग्णालयाच्या दिरंगाईने संताप
परप्रांतीय प्रवाशांना आरोग्य तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.हेंडवे हे रुग्णालतात हजर नसल्याने तसेच कर्मचारीदेखील हालचाल करीत नसल्याने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष माळी यांनी जळगाव सिव्हिल सर्जन डॉ.एन.एस.चव्हाण यांच्याशी बोलून येथील प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी डॉ.देवर्षी घोषाल यांना तत्काळ येथे पाठवून या प्रवाशांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यास सांगितले.

यांचे मोलाचे परीश्रम
24 प्रवाशांच्या आरोग्य तपासणीसाठी लागणारे फॉर्म भरून घेणे तसेच त्यांच्या आधार कार्डाची झेरॉक्स काडून त्यांना योग्य माहिती हिंदी भाषेत देण्यासाठी तालुकाध्यक्ष दीपक मराठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष माळी, सामाजिक कार्यकर्त्या सविता माळी, यश चौधरी, प्रवीण चौधरी यांनी मदत केली. त्यानंतर जळगाव आगार प्रमुख यांच्याशी सविता माळी आणि संतोष माळी यांनी संपर्क साधून त्यांना 24 प्रवाशी यांना छत्तीसगड येथे सोडण्याची विनंती केली. त्यानंतर संतोष माळी आणि सविता माळी यांनी भुसावळ येथे जाऊन 24 प्रवाशी यांची आगारप्रमुख यांना नावांची यादी दिली. त्यानंतर भुसावळ आगरप्रमुख पी.बी.चौधरी यांनी कर्मचारी यांना बस सोडण्याची सूचना केली. त्यानंतर स्थानक प्रमुख पी.बी.भोई, एस.पी.चौधरी, जी.एन.झांबरे तसेच तहसीलदार दीपक धीवरे, एस.एल नागरे, एच.एल.महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बस पाहताच परप्रांतीयांचे चेहरे खुलले
या 24 प्रवासीमध्ये तरुण, वृद्ध, महिला होते. सर्वांची आरोग्य तपासणी झाल्यानंतर वरणगाव ग्रामीण रुग्णालतात सायंकाळी पाच वाजता बस येताच या 24 परप्रांतीय प्रवाशांचे चेहरे खुलले. सर्व प्रवासी बस मध्ये बसल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीचे गटनेते तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या सविता माळी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष संतोष माळी, नगरसेवक विष्णू खोले, गणेश चौधरी, रवींद्र सोनवणे, साजिद कुरेशी, समाधान चौधरी, अल्पसंख्यांक संघटक पप्पू जकातदार, ग्रामपंचयतीचे माजी सदस्य प्रकाश नारखेडे, राजेश चौधरी, गजानन वंजारी, यश चौधरी, प्रवीण चौधरी, किशन माळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परप्रांतीय प्रवाशांना निरोप दिला.

Copy