Private Advt

कुर्‍हा गावात आढळलेल्या ‘त्या’ मयताची अखेर ओळख पटली

भुसावळ : तालुक्यातील कुर्‍हेपानाचे गावात बुधवार, 6 एप्रिल रोजी अनोळखीचा मृतदेह आढळला होता व मृतदेहाच्या छातीवर भील राजा व दंडावर ‘तेरे नाम’ गोंदलेले असल्याने त्यावरून पोलिसांनी मयताची ओळख पटवली. अजय श्रावण मोरे (40, रा.जळगाव) असे मयताचे नाव आहे. अनोळखी मृतदेह आढळल्यानंतर तालुका पोलिसांनी हा मृतदेह जळगाव येथील शासकीय हॉस्पीटलला शवागारात ठेवला होता मात्र त्याच दिवशी सायंकाळी लक्ष्मी अजय मोरे यांनी तालुका पोलिसात पती हरवल्याची नोंद केली होती व पोलिसांनी मयताचे वर्णन सांगितल्यानंतर महिलेने खातरजमा केल्यानंतर मयत हाच पती असल्याचे सांगितले होते.

शवविच्छेदनानंतर कारण होणार स्पष्ट
अजय मोरे व त्यांच्या पत्नी लक्ष्मी या भंगार वेचून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात शिवाय जळगावच्या रामानंद नगर परीसरात ते वास्तव्याला आहेत. पती भुसावळ परीसरात आल्यानंतर बेपत्ता झाल्याने महिलेने तालुका पोलिसात हरवल्याची तक्रार दिली होती व पोलिसांना अनोळखीचा मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी त्याबाबत महिलेला वर्णनावरून फोटो दाखवताच महिलेने ओळख पटवली होती. सोमवारी मृतदेहावर जळगावात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे स्पष्ट कारण कळणार आहे. तपास हवालदार संदीप बडगे करीत आहेत.