वरणगावातील पीएसआय, कॉन्स्टेबलला 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

जळगाव- वाळू वाहतुकीच्या डंपरबाबत कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 10 हजार रुपयांची लाच मागणार्‍या वरणगावातील पोलीस उपनिरीक्षक व लाच स्वीकारणार्‍या कॉन्स्टेबलला गुरुवारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
तक्रारदाराच्या मालकीचे डंपर (क्र.एमएच 40 एन 4086) वाळू वाहतुकीचे काम करते. त्या वाहनावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात वरणगाव पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सुनील जगन्नाथ वाणी (वय 56) यांनी 10 हजार रुपये लाच मागितली. ही रक्कम कॉन्स्टेबल गणेश महादेव शेळके (वय 31) याने पोलीस ठाण्यात स्वीकारली. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.