वरणगावातील कब्रस्थानसह ऑर्डनन्स फॅक्टरीकडे जाण्यासाठीचा मार्ग मोकळा

0

भुसावळ : वरणगाव शहरातून नवीन महामार्गावर जातांना पूल नसल्याने ऑर्डनन्स फॅक्टरीत जाण्यासाठी नवीन महामार्गावर पूल बांधला जावा यासाठी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, ऑर्डनन्स फॅक्ट्री महाप्रबंधक एस.चॅटर्जी यांच्याकडे आरो ब्रीजची मागणी केली होती. त्या अनुषंगाने पुलाच्या कामाची सुरुवात ‘नही’ या कंपनीने केली असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली.

लोकप्रतिनिधींनी मानले नेत्यांचे आभार
ऑर्डनन्स फॅक्टरीकडे जाण्यासाठी व मुस्लिम कब्रस्थानकडे जाण्यासाठी पूल आवश्यक होता. अनेक वेळा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांनी सभेत ठराव केला तसेच जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व नहिच्या कंपनी सोबत बैठका झाल्या होत्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा प्रश्न निकाली काढल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे यांचे आभार नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेवक माला मेढे, नसरीन बी.कुरेशी, मेहताज बी.पिंजारी, हाजी अल्लाउद्दीन सेठ, कामगार नेते मिलिंद मेढे यांनी आभार मानले आहेत.