Private Advt

वरणगावातील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार : तिघांविरोधात गुन्हा

वरणगाव : शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना सोमवार, 11 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी मंगळवारी वरणगाव पोलिसात तिघांविरोधात पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मजीद शहा हमीद शहा (21), रज्जाक शहा (22, दोन्ही रा.वरणगाव, ता.भुसावळ) व एका आरोपीचा अल्पवयीन आरोपींमध्ये समावेश असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे तर अल्पवयीन ताब्यात घेण्यात आले आहे.

वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल
वरणगावातील एका भागातील संशयीत आरोपी मजीद शहा हमीद शहा याने मुलीला तुझ्याशी काम असल्याचे सांगत दुचाकीवरून बोदवड रस्त्याने नेले. मात्र गाडीचे पेट्रोल संपल्याने मुलीला एकटीच सोडून तो निघून गेला. काही वेळाने त्याचे दोन मित्र पिंपळगावकडून आले. त्यांनी संबंधित मुलीला तुला मजीदने बोलावल्याचे सांगितले. तिने नकार दिल्यावर मजीद स्वत: तिथे येऊन मुलीला रस्त्याच्या पलिकडे घेऊन गेला. तेथे तिच्यावर अत्याचार करून निघून गेला तर रज्जाक शहा व एक अल्पवयीन मित्र हे रस्त्यावर लक्ष ठेवत उभे होते. गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ करीत आहेत.