वरणगावला प्रभाग दोनमध्ये गव्हासह किराणा वाटप

0

महात्मा फुले जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष माळी यांचा कष्टकरी नागरीकांना मदतीचा हात

वरणगाव : शहरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष माळी यांनी हातावर पोट असलेल्या 100 कष्टकरी नागरीकांना 5 क्विंटल गव्हासह तिखट, मीठ, धना पावडर या किराणा सामानाचे वाटप शनिवारी केले.

कष्टकर्‍यांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य
कोरोनाच्या महाभयंकर विषाणूच्या संसर्ग आजारामुळे सर्वत्र हाहाःकार माजला आहे. देशात लॉक डाऊन असल्यामुळे हातावर पोट असलेल्या कष्टकरी मजूर नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन थोर समाजसेवक बहुजनांचे महानायक क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची आज जयंती असल्यामुळे त्यांना स्मरण व अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष माळी यांनी प्रभाग क्रमांक दोनमध्ये 100 कष्टकरी नागरीकांना 5 क्विंटल गव्हासह तिखट, मीठ, धना पावडर या किराणा सामानाचे वाटप केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी माळी समाज अध्यक्ष सोपान माळी, राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरसेवक रवी सोनवणे, गणेश चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, फिरोज खान, हाजी जमील खान, सय्यद अझहर, आवेस खान, अजमल खान, बापू माळी, भूषण माळी, प्रवीण माळी प्रल्हाद माळी, सचिन माळी, पांडू माळी उपस्थित होते. दरम्यान, यशस्वीतेसाठी बाळा माळी, किरण माळी, भैया माळी, पवन माळी, उमेश माळी, विवेक माळी, संकेत माळी, निखिल माळी, फरहान खान, नितीन माळी, सागर माळी यांच्यासह शिवबा मित्र मंडळच्या सर्व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

Copy