वरणगावलाच होणार राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र

0

आमच्या कामात दम, धमक अन् पतही – ना. गुलाबराव पाटील

जळगाव – भुसावळ तालुक्यातील हतनूर-वरणगाव येथील राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र जामखेड तालुक्यात स्थलांतरीत करण्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी याबाबत चर्चा करून आज उच्चस्तरीय पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेण्यास भाग पाडले. यात एसआरपीएफ १३०३ हे प्रशिक्षण केंद्र हतनूर-वरणगाव येथेच होणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. दरम्यान आमच्या कामात दम, धमक आणि पतही असुन जिल्ह्याचे पालकत्व सिध्द केल्याचा टोला ना. गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे.