वरणगावनजीक चार लाखांचा गुटखा जप्त

भुसावळ : राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातून राज्यात येणारा ओमनी वाहनातील तब्बल चार लाखांच4ा गुटखा जप्त केला. सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. हतनुर-टहाकळी मार्गावर सापळा रचुन चारचाकी (क्रमांक एम.एच. 19 ए.पी.2114) येताच पोलिसांनी गोण्यांमध्ये भरलला गुटखा जप्त केला व तो वरणगाव पोलिस ठाण्यात आणण्यात आला. चारचाकीसह संशयीत सुनील माळी व वाहन चालकविनोद चौधरी (44, वरणगाव) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक पाटील, विनायक पाटील, रवींद्र नरवाडे, महेश महाजन, इद्रीस खान पठाण, एन.ए.शहा, जावेद शेख, अतुल बोदडे, नरसिंग चव्हाण आदींच्या पथकाने केली.