वरणगावच्या महिलेचा मृत्यू अपघाती मृत्यू

0

वरणगाव : येथून जवळच असलेल्या साई हॉटेलजवळ भरधाव चारचाकी झाडावर धडकून झालेल्या अपघातात वरणगावच्या महिलेचा मृत्यू झाला तर चालकासह अन्य एक जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. नशिराबाद पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून ती वरणगाव पोलिसात वर्ग करण्यात आला.

झाडावर धडकली चारचाकी
फुलगावकडून वरणगावकडे निघालेली चारचाकी (एम.एच.14 एच.जी.0970) वरील नियंत्रण सुटल्याने ती झाडावर धडकून झालेल्या अपघातात वरणगाव येथील पूनम राहुल चौधरी (24) या महिलेचा मृत्यू झाला तर कार चालक दीपक मधूकर सोनार (25, रा.वाकी) व अक्षय विकास अंभोरे (23, रा.वाकी, ता.बोदवड) जखमी झाले. अंभोरे यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी धाव घेत जखमींना स्थानिक नागरीकांच्या मदतीने उपचारार्थ हलवले. नशिराबाद पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून ती वरणगाव पोलिसात वर्ग झाल्याचे सहा.निरीक्षक बोरसे यांनी सांगितले.