वरखेडेनजीक द्राक्ष वाहतूक करणारे वाहन उलटले : ग्रामस्थांची द्राक्षांची लूट

0

बोदवड : तालुक्यातील वरखेड खुर्द येथील पुलाजवळ मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास वाहनावरचे नियंत्रण सुल्याने द्राक्षांची वाहतूक करणारे बोलेरो वाहन रस्त्याखाली उतरून उलटल्याने चालकासह क्लिनर किरकोळ जखमी झाले तर वाहन पलटी झाल्याची संधी साधून नागरीकांनी द्राक्षांची अक्षरशः लूट केली. या अपघातात किमान 50 हजारांचे व्यापार्‍याचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

द्राक्ष लूटण्यासाठी उसळली गर्दी
नाशिक येथून नांदूरा येथे द्राक्षांची वाहतूक केली जात असताना वरखेड गावाच्या पुलाजवळ वाहन उलटल्याने चालकास क्लिनरला किरकोळ दुखापत झाली. ग्र्रामस्थांनी दोघांना प्राथमिक आरोग्य केंद्र, एणगाव येथे उपचारासाठी हलवले तर दुसरीकडे वाहनाचा अपघात झाल्याची संधी साधून रस्त्यावरून प्रवास करणार्‍या नागरीकांनी द्राक्षांची लूट केली. यावेळी गावातील जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस सचिन राजपूत, पवन पाटील, विष्णु पाटील, अजय पाटील व शिवाजी राणा यांनी चालकाला गाडीतून बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात नेले. गाडीत द्राक्षाचे 300 बॉक्स होते. यात 150 बॉक्स चांगले असल्याने व्यापार्‍याला सहकार्य करीत ते दुसर्‍या गाडीत भरून देण्यात आले.

Copy