वरखेडी बसस्थानक परीसरात अतिक्रमणाचा भस्मासुर

0

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
वरखेडी – भोकरी – वरखेडी येथील खलील-ए-मजीद ते बँक ऑफ महाराष्ट्रपर्यंत पाचोरा – जामनेर राज्य मार्ग क्र. 19 ला लागुन उकिरडयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्याच्या दोनही बाजुला अतीक्रमचा भस्मासुराने रस्ता आहे की नाही, असे चित्र दिसून येत आहे. या रस्त्याच्याकडे आयशर ट्रक्टर टेम्पो लहान मोठ्या गाड्या, गुरे बादलेली, भंगराची दुकानाचा कहर, गॅस वेल्डींग वालाची निम्या रस्त्यातपर्यंत कामे, तसेच लाकुड फाटा मोठ-मोठी उकीरडे आहे. स्थानीक रहिवाशीचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु या मोठ्या प्रमाणवर रहदारी असलेल्या या राज्य मार्गावरती खलील मजीद रेल्वे गेट व महाराष्ट्र बँकपर्यंत अनेक लहान मोठे अपघात झालेले आहे. अनेकवेळा अपघात झाल्याने काहींना दुखापत झाले आहे. याच रोडवर संध्याकाळी व सकाळी वाहनाचा चालवना सोडाच पायही सुध्दा चालताना जीव मुठीतधरून चालवे लागते.

विद्यार्थ्यांचा जीव मुठीत होतो मार्गक्रम
उकिरडे राज्य मार्गाववर विखुरलेले असुन रस्त्याच्या दोनही कडेने गाड्या पॉर्किंग करून उभ्या असतात. समोर समोर दोन मोठी वाहने आली तर मोठा बिकट प्रसंग निर्माण होऊन अपघातास निमंत्रण मिळत असते. या राज्यमार्ग वरती ग्राम स्वच्छता अभियानाची पुरती ऐसी की तैसी झाल्याने चिञ या ठिकाणी स्पष्टपणे दिसुन येते रेलवे फाटकाच्या पुढे खलील मजीद जवळ ही रोडाच्या दोन ही बाजुने मोठे मोठया गाड्या पार्किंग करून राञन दिवस उभा असतात येनऱ्या जानाऱ्या रोडवरचे काहिच दिसत नाही तर पुढे पी.डी. बडोला माध्यमीक विदालय असुन शालेय विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी मार्गक्रमण करतांना अपघताची शक्यता नेहीमीच निर्माण होत असते. तरी याकडे सार्वजनिक बांधकाम विभागणे त्वरीत लक्ष देण्याची मागणी रहिवाश्यांकडून होत आहे.