Private Advt

वरखेडी फाट्याजवळ ट्रकच्या धडकेने अपघातात वकीलाचा मृत्यू

0

धुळे- मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने शहरातील देवपुरातील श्रीकृष्ण कॉलनीतील रहिवाशी तथा व्यवसायाने वकील असलेल्या कपिल साईनाथ अहिरे (38, पाटील) यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री मोहाडी उपनगरातून दुचाकी (एम.एच. 18 ए.एम.9930) ने श्रीकृष्ण कॉलनीकडे येत होते. त्यांच्या पाठीमागे त्यांचे चुलत भाऊ नीलेश पाटील हेही येत होते. महामार्गावरील वरखेडी फाट्याजवळ पाठीमागून येणार्‍या एमएच 18-बीजी 9507 या क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर फेकले गेले. यात त्यांना दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. मागून येणारे नीलेश पाटील यांनी अपघाताची माहिती आझादनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. नीलेश पाटील यांच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.