वयाच्या ६४ व्या वर्षी गायक मोहम्मद अझिज यांचे निधन

0

मुंबई : सुप्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात निधन झाले आहे. आपल्या भारदस्त आवाजाने त्यांनी हिंदी चित्रपट रसिकांची मने जिंकली होती. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, पॉप संगीत अशा सर्व प्रकारचे पार्श्वगायन त्यांनी केले.

अझिज यांचा जन्म २ जुलै १९५४ ला पश्चिम बंगाल येथे झाला. संगीतकार अनु मलिक यांनी त्यांना पहिल्यांदा हिंदी चित्रपट मिळवून दिला. मोहम्मद रफी यांच्या गाण्याचे ते खूप मोठे चाहते होते. अझिज यांनी सर्वात पहिल्यांदा ‘ज्योती’ या बंगाली चित्रपटातून गायनाला सुरुवात केली.

मोहम्मद अझिज यांच्या अकाली निधनाने हिंदी, बंगाली, ओडिशा संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.

Copy