वनस्पतीशास्त्र विषयाच्या विद्यार्थाना ऑनलाईन मार्गदर्शन

0

फैजपूर : तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक शिवाजी मगर यांनी लॉकडाऊन कालावधीचा यथायोग्य वापर करून टी.वाय.बीएस्सीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम सुरू केले आहे. ऑनलाईन वर्गात डॉ.सुनील सांगळे (प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, राजाराम कॉलेज, कोल्हापूर) यांचे प्लाँट ब्रीडींग या टॉपिकवर मार्गदर्शन झाले. त्यात त्यांनी प्लांट ब्रीडिंगबद्दल सखोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन केले. या ऑनलाईन वर्गामध्ये मंदार बामणोदकर, पौर्णिमा, प्रियांका, कोमल, पूर्वा, अदिती, दिव्या, सपना, जयश्री, सुयोग्य इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.

Copy