वनरक्षक दत्तात्रय जाधव यांचे अपघाती निधन

0

बामणोदजवळ भरधाव चारचाकीने दुचाकीने धडक दिल्याने अपघात

फैजपूर : यावल पूर्व विभागात कार्यरत असलेले वनरक्षक तथा सेवानिवृत्त सैनिक दत्तात्रय जाधव (45) यांचे रविवार, 14 रोजी रात्री पाल, ता.रावेर येथून भुसावळ येथे आपल्या दुचाकीने भुसावळ येथे घरी जात असताना बामणोद गावाच्या पुढे भुसावळकडून येणार्‍या मारुती कारने जोरदार धडक दिल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना रात्री एक वाजेच्या सुमारास घडली. मयत डी.डी.जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री दोन वाजेपासून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

वनकर्मचार्‍यांमध्ये वर्गात हळहळ
यावल ग्रामीण रुग्णालयात कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे मयताचे नातेवाईकांनी सांगितले. याबाबत फैजपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पुढील कार्यवाही सुरू केलेली आहे. मयत वनरक्षक डी.डी. जाधव हे मूळचे जामनेर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन मधील दीपक जाधव यांचे ते भाऊ तर जामनेर येथील अशोक पहेलवान उर्फ जाधव यांचे ते पुतणे होत. त्यांच्या अकस्मात अपघाती निधनामुळे त्यांच्या नातेवाईकांमध्ये तसेच संपूर्ण यावल व पश्चिम वन कर्मचारी वर्गात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Copy