वनरक्षकासह मारहाण प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा

0

यावल : तालुक्यातील वाघझिरा वनक्षेत्रातून सागवान वृक्षांची बेकायदेशीर कटाई करून वाहतूक करणार्‍यांना परवानगी पास विचारण्यास गेलेल्या वनरक्षकास व सोबत एक व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वाघझीरा आंबापाणी राखीव वनक्षेत्र येथे मुख्यालयात कार्यरत असलेले राकेश सुभाष निकुंभे (वनरक्षक, वाघझीरा उत्तर यावल पश्‍चिम) वनक्षेत्र वाघझिरा नाक्यावर कार्यरत असतांना 18 मे रोजी सायंकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास लकडु ईश्‍वर बारेला हा सागवान लाकून नेतांना आढळून आला. निकुंभे यांनी याबाबत विचारणा केली असता त्याने वनरक्षक राकेश सुभाष निकुंभे यांच्यासह एकाला ईश्‍वर लकडु बारेला, गज्या हरासिंग पावरा , लकडु चैनसिंग बारेला , भगवान चैनसिंग बारेला व त्यांची आई नांव माहीत नाही या सर्व सहा लोकांनी मिळुन लाता बुक्यांनी मारहाण केली. वनरक्षक राकेश निकुंभे यांनी फिर्याद दिल्याने या सर्वांंविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सुनी सोपान तायडे हे तपास करीत आहेत.

Copy