वनक्षेत्राच्या नुकसानभरपाईसाठी पं.स.त ठराव

0

साक्री । साक्री तालुक्यातील काळटेक ग्रामपंचायत हद्दीतील 72 हेक्टर वनजमीनीपैकी 70 ते 80 टक्के जळीत वनक्षेत्राच्या नुकसान भरपाईसह आदिवासी जनहितार्थ विविध मागण्यांबाबत साक्री पंचायत समितीच्या उपसभापती रेखा बागूल यांनी आयत्या वेळच्या विषयात मुद्दा मांडून पंचायत समिती सभागृहात जळीत वनक्षेत्राच्या नुकसान भरपाईसह अनुसूचित क्षेत्रात नव्याने वनफळ झाडांच्या लागवडीच्या प्रश्‍नावर चर्चा घडवून आणून काळटेक ग्रामपंचायतीतील प्रत्येक सहभागी कुटूंबाला जळीत वनक्षेत्राची नुकसान भरपाई त्वरीत देण्याची मागणी केली.

सुझलॉनच्या विरोधात मोर्चा
साक्री तालुक्यातील वनक्षेत्रात आदिवासी समाजाचे डोंगर्यादेवाचे श्रद्धास्थान असलेल्या शेवगागड परिसरात ग्राम पंचायतीने वनसंवर्धन केलेल्या आदिवासी कुटूंबाचे वनझाडांसह वनफळ झाडांचे सुझलॉन कंपनीच्या विद्युत वाहिनीच्या शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. 21 एप्रिल रोजी केलेले रास्तारोको आंदोलन व ठिय्या आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मागण्यांवर मा.जिल्हाधिकारी, उपविभागीय जिल्हाधिकारी धुळे व अप्पर तहसिलदार, पिंपळनेर यांनी सदर निवेदनावर गांभिर्याने विचार व्हावा व निवेदनातील मागण्यांवर सत्वर अंमलबजावणीची कार्यवाही करावी असा ठराव सर्वानुमते साक्री पंचायत समितीच्या मासिक सभेत पारित करण्यात आला आलेला आहे, असे साक्री उपसभापती बागूल यांनी पत्रकात नमुद केले आहे.