Private Advt

वढोदा जंगलात सेवानिवृत्त सैनिकाचा खून : दोघा आरोपींना कोठडी

मुक्ताईनगर : कोल्हापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त सैनिकाचा खून केल्याप्रकरणी अटकेतील पिता-पूत्रांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोघांना 13 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात अन्य पाच संशयीत पसार असून त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे. दादा हरी बन्सी पवार (23) व अजय दादा पवार (52) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

जंगलात मारहाण करून लुटले
सेवानिवृत्त सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील (52, सावर्डे बु.॥, ता.कागल, जि.कोल्हापूर) व अनिल आनंदा निकम (41) यांनी शेगाव दर्शनाचा बेत केल्यानंतर दोघेही 5 रोजी निघाले असता नांदुरापर्यंत पोहोचल्यानंतर पवार नामक व्यक्तीने प्रल्हाद पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना घेण्यासाठी एकास पाठवल्याने दोघे एका संशयीतासोबत दुचाकीने निघाले मात्र जंगलात आल्यानंतर निकम व पाटील यांना सात जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याने बेदम मारहाणीत पाटील यांचा मृत्यू ओढवला होता. यानंतर दोघांना संशयीतानी पुलावरून फेकल्यानंतर धूम ठोकली. या प्रकरणी सुरूवातीला नांदुरा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो मुक्ताईनगर पोलिसात वर्ग करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून अन्य पसार आरोपींचा कसून शोध सुरू आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.