वड्रीतील मजुराला सर्पदंश

0

यावल- तालुक्यातील वड्री शेतशिवारात सुपडू सलदार तडवी (वय 35) हे शेतात कापूस वेचणी करीत असताना त्यांच्या डाव्या पायास सापाने चावा घेतल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. ही बाब लक्षात येताच त्यांना यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ.परवीन तडवी यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

Copy