वडिलांच्या मृत्युचे दुःख विसरुन ऋषीकेशने दिली परीक्षा

0

जळगाव। एकीकडे परीक्षा तर दुसरीकडे वडिलांचा मृत्यु अशा दुर्देवी प्रसंगअसतांना वडिलांच्या मृत्युचा दुःख करीत न बसता 12 वीच्या वाणिज्य शाखेत शिक्षण घेणार्‍या ऋषीकेश शिवाजी पाटील याने वडिलाचा मृत देहाला अग्निडाग देऊन बारावीची परीक्षा दिली. वडील गेल्याचे डोंगराएवढे दुःख असतांनाही ऋषीकेशने धैर्याने परीक्षा दिली. बुधवारी 15 रोजी ऋषीकेशचा शेवटचा पेपर होता. त्यांच्या धैर्याचा व साहसाचा कौतुक होत आहे.

पिंप्राळा गावातील बांधकाम व्यावसायिक शिवाजी धनसिंग पाटील यांचा मंगळवारी 14 रोजी हृदय विकाराचा तिव्र झटकाने निधन झाले. ते 44 वर्षाचे होते. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांचे कुटुंबीय नातेवाइकांना मोठा धक्का बसला. पिंप्राळ्याचे नगरसेवक आबा कापसे आनंदराव कापसे यांनी नुतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, प्रा.सुनिल गरुड नेमीचंद जैन यांच्या शी संपर्क करुन ऋषीकेशच्या वडिलाच्या निधनाविषयी माहिती दिली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांला समज देत परीक्षा देण्यासाठी धीर दिला.