वडिलांच्या निधनामुळे ऋषभच्या खेळावर प्रश्नचिन्ह

0

नवी दिल्ली । भारतीय संघाचा युवा खेळाडू आणि आयपीएलमध्ये दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाकडून खेळणार्‍या ऋषभ पंतच्या वडिलांचे बुधवारी रात्री आकस्मिक निधन झाले. वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच ऋषभ थेट घरी रवाना झाला. वडिलांच्या निधनामुळे ऋषभ पंत आयपीएलमधील समावेशाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 8 एप्रिलला दिल्लीचा पहिला सामना खेळविण्यात येणार आहे. पण पितृशोकामुळे ऋषभच्या खेळण्याबाबतच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हरिद्वार येथे झाले अत्यसंस्कार
ऋषभचे वडील 53 वर्षांचे होते. बुधवारी रात्री 9 वाजता ऋषभची आई सरोज पंत या त्यांना उठवण्यासाठी गेले असता त्यांनी बराच वेळ काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना त्वरित नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी हरिद्वार येथे ऋषभच्या वडीलांवर अत्यसंस्कार करण्यात आले. नुकतेच काही महिन्यांपू्र्वी रणजी करंडक स्पर्धेत दिल्लीकडून खेळताना ऋषभने दमदार कामगिरी केली होती. या पार्श्वभूमीवर त्याच्याकडून आयपीएलमध्येही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.