वडाळा येथे बांधावरून पशुधनाची चोरी

अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल

चाळीसगाव: गुरांना चारा पाणी करून झोपण्यासाठी गेलेल्या व्यक्तीने सकाळी पहाटे पाच वाजता दुध काढण्यासाठी शेतात गेला असता. शेताच्या बांधावरून चार गायी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना उघडकीस येताच ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती, सुभाष रामदास अहिरराव (वय- 53 रा. वडाळा ता. चाळीसगाव) येथे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्यास आहेत. व्यवसाय शेती असल्याने शेतात 5 बैल व 2 गायी असे एकूण 7 गुरेढोरे आहेत. मात्र दि. 17 एप्रिल रोजी रात्री 10:20 वाजताच्या सुमारास सुभाष अहिरराव यांनी गुरांना चारा पाणी करून तो झोपण्यासाठी घरी गेला. दरम्यान सकाळी 5 वाजता दुध काढण्यासाठी अहिरराव हा शेतात गेला असता. पाच बैल जागीच बांधून होते. परंतु दोन गायी (10,000 किंमतीची एक गाय व 4000 किंमतीची दुसरी गाय) ह्या जागेवर दिसून न आल्याने शेजारच्या शेतात शोधा घेतला. तेव्हा सतिष सखाराम आमले यांची 5,000 हजार किंमतीची काळ्या रंगाची गाय व ज्ञानेश्वर ठाकूर यांची 3,000 हजार रुपयांची गाय यांच्याही गायी चोरी झाल्याने एकूण चार गायी चोरी झाल्याची घटना तालुक्यातील वडाळा परिसरात घडली आहे. एकूण 30,000 हजार रुपये किंमतीच्या गायी अज्ञात इसमाने चोरून नेल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. 17 एप्रिल रोजी रात्री 10:20 ते 18 एप्रिल रोजी सकाळी 5 वाजताच्या दरम्यान हि घटना घडली आहे. याबाबत सुभाष अहिरराव यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात आज फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास गोवर्धन बोरसे हे करीत आहेत.