वडलीजवळ कापसाचा ट्रक उलटल्याने 21 मजूर जखमी ; 4 गंभीर

0

जखमीमध्ये सर्व तरुण ः रुग्णवाहिकेने जिल्हा रूग्णालयात केले दाखल

जळगाव – तालुक्यातील विटनेरहून कापूस भरुन पाचोर्‍याकडे जात असलेला ट्रक वडलीजवळ वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकमजून 21 मजूर जखमी झाले असून त्यापैकी 4 जण गंभीर आहेत. सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. जिल्हा रुग्णालयात जखमी मजूराकडून मिळालेली माहिती अशी की, कापसाचे व्यापारी बाळू वाघ रा.वरखेडी, ज्ञानेश्‍वर वाणी रा. सातगाव डोंगरी, व भरत जैन रा. पाचोरा यांनी गुरुवारी सकाळी ट्रक भरण्यासाठी विटनेर गावात पाठविला होता. त्यानुसार 12 टायर असलेला ट्रक (एम.एच 20, डी.ई. 2526) हा विटनेर गावात पोहचला. येथून ट्रकमध्ये तीन ते चार शेतकर्‍यांचा कापसाचा माल भरण्यात आला.

गुजरात जाणार होता ट्रक
ट्रक खाली करण्यासाठी ट्रक गुजरातकडे जाणार होता. तत्पूर्वी सर्व मजूर पाचोर्‍याला उतरणार होते. त्यानंतर ट्रक पुढे रवाना होणार होता. त्याआधीच ट्रक वावदड्या पासून 2 कि.मी. अंतरावर वडलीजवळ वळणावर वाहनचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. यात ट्रकमधील मजूर 21 जखमी झाले. दरम्यान वाहनचालकाने मद्यप्राशन केले असल्याने ट्रक उलटल्याचे जखमी दत्त मोकळे याने सांगितले.

जखमी मजूर सातगाव डोंगरीचे
यात ट्रकमध्ये कापूस भरण्यासाठी गेलेले सर्व मजूर हे पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील आहेत. यात भूरा तडवी (23), परवेश शेख (17), विकास शामराव पाटील (26), बंडू कोळी(24), पिंटू कोळी(22), दत्तू वाल्मिक मोकळे(22), संदीप गणपत कोळी(22), तात्याराव दगडू गवते (40), सुनील पुंडलिक डांबरे (30), समाधान महादू महाले(20), गोकूळ साहेबराव पोटे(22), रविंद्र वाल्मिक कोळी (23) जखमी तर विठ्ठल कोळी(30), गजानन भावडू जाधव(26), भैय्या संतोष गवळी (24) आणि मोईन गफूर शहा (30) हे गंभीर जखमी झाले आहेत.

Copy