Private Advt

वडगाव हवेलीतील तिघांचा मृत्यू : नातेवाईकांनी वर्तवला घातपाताचा आरोप

सातारा : ओदिशामधील भुवनेश्वर येथे दाम्पत्यासह त्यांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले. मयत तिघेही सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तुषार जगताप, त्यांची पत्नी नेहा आणि मुलगी शिवन्या अशी मृतांची नावे आहेत. ते सर्वजण मुळचे वडगाव हवेली येथील रहिवासी आहेत. त्यांचा भुवनेश्वर येथे संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला.

राहत्या घरात सापडले मृतदेह
वडगाव हवेली येथील तुषार जगताप हे पत्नी आणि मुलीसह भुवनेश्वर येथे वास्तव्यास होते. तिथेच राहत्या घरी त्यांचे मृतदेह सापडले होते. त्यानंतर पोलिसांनी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून हे मृतदेह महाराष्ट्रात पाठवण्यात आले मात्र हे मृत्यू संशयास्पद असून घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने गावात तणाव निर्माण झाला तसेच मृतदेह असलेली रुग्णवाहिका पोलीस ठाण्यासमोर आणण्यात आली होती. अखेरीस पोलिसांनी तक्रार घेऊन समजूत काढल्यानंतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.