वडगाव येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

0

चाळीसगाव : भडगाव तालुक्यातील वडगाव येथिल प्रताप माध्यमिक विद्यालयात माताजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कै. गजाननराव रघुनाथराव गरूड यांच्या 32 व्या पुण्यतीथीनिमित्त मंगळवार 20 डिसेंबर रोजी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भडगाव तालुक्यातील उत्कृष्ट वक्तृत्व करणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे व त्यांचे व्यक्तीमत्व प्रगल्भ व्हावे या हेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावे असे आवाहन आयोजक माताजी चॅरिटेबल ट्रस्टचे संजयजी गरुड, दीपक गरुड, डॉ. विशाल पाटील, डॉ.अर्चना पाटील, अशोक देशमुख यांनी केले आहे.