वडगाव मावळमध्ये राष्ट्रवादीला झटका; बाळासाहेब नेवाळे समर्थकांसह भाजपात !

0

वडगाव मावळ : पुणे जिल्हा बॅकेचे संचालक, तसेच पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आज मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मावळ विधासभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब नेवाळे इच्छुक होते. परंतु त्यांना उमेदवारी नाकारून भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले सुनील शेळके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यामुळे नेवाळे हे नाराज होते. दोनच दिवसापूर्वी त्यांनी जिल्हा बॅक व जिल्हा दूध संघाचा संचालक पदाचा राजीनामा दिला. त्या पाठोपाठ त्यांचे भाचे पंचायत समितीचे सदस्य दतात्रय शेवाळे यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.

बाळासाहेब नेवाळे, पंचायत समिती सदस्य दतात्रय शेवाळे यांच्यासह हजारो कार्यकर्ते तळेगाव येथील भाजपच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

Copy