Private Advt

वडगाव नालबंदी गावातील 22 वर्षीय युवतीची आत्महत्या

भडगाव : तालुक्यातील वडगाव येथील 22 वर्षीय युवतीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.सोनी उर्फ सविता किरण राठोड (22, रा.वडगाव नालबंदी, ता.भडगाव, जि.जळगाव) असे गळफास घेतलेल्या युवतीचे नाव आहे.

घरी कुणी नसताना घेतला गळफास
सोनी राठोड ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होती. मंगळवार, 5 एप्रिल रोजी घरी कुणीही नसतांना सोनी राठोड हिने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली व सायंकाळी कुटुंबीय घरी आल्यानंतर त्यांनी मोठा आक्रोश केला. शेजारच्यांच्या मदतीने सोनी राठोड हिला भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण नेमके कळू शकले नाही. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.