वडगावात पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीत टाकले मांसाचे तुकडे व दारूच्या बाटल्या

0

संशयीतास निंभोरा पोलिसांनी घेतले ताब्यात : ग्रा.पं.विहिरीवरील पाणीपुरवठा केला बंद

रावेर : तालुक्यातील वडगाव येथील पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीत मांसाचे तुकडे व गावठी दारूच्या रीकाम्या प्लस्टिक पिशव्या टाकल्याचा प्रकार उघडकीस आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. या विहिरीवरून होणार पाणीपुरवठा तत्काळ ग्रामपंचायतीने बंद केला आहे.

ग्रामपंचायतीने विहिरीवरून पाणीपुरवठा केला बंद
वडगाव येथील देविदास इंगळे याचा शेजार्‍याशी वाद झाला होता. त्यामुळे इंगळे याने वाद झालेल्या व्यक्तीचे बकरीचे पिल्लू चोरून कापून त्याची भाजी बनवली. उरलेले कातडे व इतर मांसाचे अवशेष ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीत टाकले होते. बकरीचे पिल्लू दिसत नसल्याने इंगळे यांना संशय आला. याबाबत इंगळे यांना विचारणा केली असता त्याने पिल्लू चोरून कापल्याचे सांगत पिल्लाची कातडी व उरलेले मांस पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीत टाकल्याचे सांगितले. या कृत्याबाबत गावात नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त करीत त्याला चांगलाच प्रसादही दिला.
घटनेची माहिती सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना समजताच या विहिरीवरून होणारा सार्वजनिक पाणीपुरवठा ग्रामपंचायतीकडून तत्काळ बंद करण्यात आला आहे. रविवारी सकाळी टीसीएल पावडरने विहिरीतील पाण्याचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. विहिरीत इंगळे याने टाकलेले मासाचे तुकडे, कातडी, व दारूच्या रीिाम्या प्लॅस्टिकच्या पिशव्या काढण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी विहिर दूषित करणार्‍या देविदास इंगळे याच्याविरुद्ध ग्रामपंचायतीतर्फे निंभोरा पोलिसांत कारवाई करण्यासाठी तक्रार करण्यात आली असून त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Copy