‘वंदे मातरम’ राष्ट्रीय गीत नाही! सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

0

नवी दिल्ली : ‘वंदे मातरम’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. कायद्यात राष्ट्रीय गीत अशी संकल्पना नसल्यामुळे ‘वंदे मातरम’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

राष्ट्रगीत ‘जण गण मन’ सरकारी कार्यक्रमांमध्ये वाजवले जाते, त्याच धर्तीवर ‘वंदे मातरम’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा द्यावा आणि ते सरकारी कार्यक्रमांमध्ये वाजवले जावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. पण देशाच्या संविधानात राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत अशी संकल्पना आहे, राष्ट्रीय गीत अशी संकल्पनाच नाही त्यामुळे ‘वंदे मातरम’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला.